कुबेरची उपासना

आपल्या घरात सदैव सुख-समृद्धी असावी असं आपल्याला वाटत असतं. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, असं आपल्याला नेहमी वाटतं. धर्मशास्त्रात यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे.

घरामध्ये कुबेराची मूर्ती अथवा फोटो असावा. कुबेर म्हणजे देव देवतांच्या संपत्तीचा रक्षक, खजिनदार. आपल्या घरातील ऐश्वर्य वाढावं .साठी या कुबेराने आपल्या घरात निवास केला पाहिजे. स्वर्गीय कोश सांभाळणाऱ्या कुबेराची मूर्ती अथवा चित्र घरात ठेवल्यास आपल्यावर कुबेराची कृपा होते आणि आपल्या अडचणी, चणचणी दूर होतात.

मात्र, कुबेराची मूर्ती घरात, दुकानात वाटेल तिथे ठेवून चालत नाही. कुबेराची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला असावी. या दिशेला कुबेराची मूर्ती बसवल्यास भाग्य उजळतं. दररोज कामाला सुरवात करण्यापूर्वी या मूर्तीच्या पोटावर हात ठेवून मनातल्या मनात प्रार्थना करा. यामुळे पैशाची आवक वाढते. ऐश्वर्य, संपत्ती यांच्यात वृद्धी होते. घरातील दैन्य- दारिद्र्य दूर होऊन समाधान मिळतं.


हि मंत्रपुष्पांजली भगवान कुबेर याना समर्पित केली आहे

आरत्यांच्या अखेरीस आणि यज्ञविधीच्या समाप्ती प्रसंगी जी 'मंत्रपुष्पांजली' म्हटली जाते ती,' वैश्रवण राजाधिराज ' म्हणजे भगवान कुबेरांनाच उद्देशून,अर्पण केलेली असते. जसा आद्यपुजेचा मान श्री गणेशांचा आहे, तसाच वैश्रवण कुबेरांच्या मंत्र पुष्पांजली खेरीज, कोणत्याही पवित्र धार्मिक विधीची समाप्ती होत नाही, हे विषेश आहे .

कुबेरची पूजा

करंगळी जवळच्यां बोटाने (अनामिकेने) कुबेराला गंध लावावे. अक्षता धुतलेल्या अखंड तांदुळांना कुंकू लावून त्या अक्षता वाहाव्या. हळद-कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही (काळा\पांढरा अबीर) कुबेराला वाहावा. फुले ॠतुकालोद्धभव पुप्षे म्हणजे त्या त्या ॠतूत येणारी ताजी आणि सुवासितक फुले कुबेराला वाहावी. जाई, जुई, कण्हेर, मोगरा, जास्वदी, चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, तर वगैरे फुले कुबेराला चालतात. परंतू लाल रंग धनदेवता कुबेर यांना अत्यंत प्रिय असल्याने लाल रंगाची फुले कुबेराला वाहावीत.

पाने धनदेवता कुबेर यांना कडूलिबाची पाने अत्यंत प्रिय असल्याने आपल्या घरात / व्यवसायाच्या ठिकाणी कडूलिंबच्या पानांचा टाळ असावा. त्याने वाईट शक्तीचा नाश होतो. व त्या जागेत पावित्र्य कायम राहते. दररोज धनदेवता कुबेरांच्या पोटाला कडूलिंबाची पाने लावून प्रार्थना करावी, असे केल्यास धनदेवता कुबेर प्रसन्न होतात.

धूप कुबेराला उदबत्ती ओवाळून तिचा धूप कुबेरावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा.

दीप निरांजन ओवाळून ते कुबेराच्या उजव्या बाजूस ठेवावे.

नैवैद्य रोजच्या पूजेत कुबेरांना पंचामृतचा नैवैद्य दाखवितात. दूध पेढे, फळे आणि पक्वाने नैवैद्यात चालतात.

तांबूल म्हणजे विड्यांची पाने आणि त्यावर सुपारी खारीक खोबरे बदाम इत्यादी ठेवावे. पानाचे देठ कुबेराकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी.

नमस्कार दोन्ही हात जोडून कुबेराला नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा.

आरती कुबेराला आरती ओवाळताना कुबेरावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी.

प्रदक्षिणा कुबेराला प्रदक्षिणा घालावी. अथवा स्वत:भोवती प्रदक्षिणा घालावी. कुबेराला नऊ प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.

प्रार्थना कुबेराला नमस्कार करून त्याची प्रार्थना आणि सर्व पूजा एकाग्र चित्ताने शांतपणे मन:पूर्वक करावी. कुबेराजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत किंवा त्याला सांकडे घालू अन्ये फक्त त्याची कृपा मागावी. कुबेराच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात.

आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणण्याची पध्दत आहे.

प्रस्तावना

प्रस्तुत मंत्रपुष्पांजली ही वेदोक्त (वेदांमधील) आहे. वेदोक्त मंत्रांना स्वर असतात. त्यामुळे हे मंत्र या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून नीट शिकून, त्याचा चांगला सराव करून मगच म्हणावेत. वेदोक्त मंत्र चुकीचे म्हटले गेल्यास त्याचा म्हणणार्या’ला त्रास होऊ शकतो.

मंत्रपुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या:संति देवा: ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान् कामकामाय मह्यंकामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्याईस्यात् सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् ।
पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिती ।
तदप्येषश्लोकोऽभिगीतो “मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्याऽवसन् गृहे ।
आविक्षितस्यकामप्रेर्विश्वेदेवा: सभासद” इति ।

अर्थ

देवांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाची, यज्ञस्वरूपी परमेश्वराची पूजा केली. यज्ञाने पूजन करणे हा त्या काळी (त्रेतायुगात) प्रमुख धर्म, साधनामार्ग होता. जेथे पुरातन, अनादि असे उपास्यदेव आहेत असे देवलोक, साधना करणारे थोर महात्मे खरोखर प्राप्त करून घेतात. (यज्ञातील हविर्द्रव्ये ज्या देवतांप्रीत्यर्थ यज्ञ केला जात असे, त्या देवतांना पोहोचून त्या तृप्त होत असत व यज्ञ करणार्यांना इष्टफलाची प्राप्ती होत असे.)

राजाधिराज, सर्वशक्तिमान् अशा वैश्रवण (ज्ञानी, ज्याने ज्ञान उत्तम प्रकारे श्रवण केले आहे अशा) कुबेराला आम्ही नमन करतो. तो सर्व कामना पूर्ण करणारा वैश्रवण कुबेर (ज्ञानी व सर्व संपत्तीचा स्वामी कुबेर), कामनांनी युक्त असलेल्या माझ्या सर्व कामना पूर्ण करो. महाराज वैश्रवण कुबेराला नमस्कार असो. आमचे कल्याण असो. आमची ऐहिक व पारमार्थिक उन्नती होवो. (कुबेराला वैश्रवण असेही नाव आहे. हा ब्रह्मदेवांचा पुत्र पुलस्त्य याचा मुलगा. त्याला ब्रह्मदेवानी अमरत्व दिले, तसेच धनाचा अधिपती व लोकपाल केले. त्याला शंकराशी सख्यत्व व यक्षांचे आधिपत्य आणि राजाधिराजपद दिले.)

सर्वसामर्थ्यवान्, चक्रवर्ती राजा असलेले आमचे हे राज्य एकछत्री, सर्व ऐश्वर्याने युक्त, मोक्षप्रद, साधनेला पोषक, सिद्धीप्राप्त, सर्वश्रेष्ठ, सर्व विश्वाचे अधिपतीत्व असलेले महान, विशाल राज्य, विश्वाच्या अन्तापर्यंत, परार्ध (ब्रह्मदेवाची राहिलेली ५० वर्षे) संपेपर्यंत चिरकाल नांदो. आमचा राजा समुद्रवलयांकित पृथ्वीचा सम्राट असो.

त्यानंतर या श्लोकाने आविक्षित मरुत्त या राजाचे स्मरण केले आहे. या राजाविषयी असे म्हटले आहे की, आविक्षित या थोर राजाच्या मुलाला त्याच्या जातकर्माच्या वेळी तुंबरूंनी आशीर्वाद दिला होता की, ‘तो चक्रवर्ती राजा होईल. इंद्र व लोकपाल त्याचे कल्याण करतील.

दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांकडील मरुत् त्याला अनुक्रमे स्वास्थ्य, पराक्रम व बल देतील.’ पुरोहिताने ‘मरुत् तव’ असा उल्लेख केल्याने व आविक्षिताचा मुलगा म्हणून तो आविक्षित मरुत्त या नावाने प्रसिद्ध झाला. हा इंद्राच्या बरोबरीचा व अतिशय वीर्यवान होता. समुद्रवलयांकित पृथ्वी त्याच्यावर अनुरक्त होती. महाराज आविक्षित मरुत्ताने काम, क्रोध व लोभ जिंकून धर्माने सार्या पृथ्वीचे पालन केले. याच्यासारखा राजा झाला नाही व पुढे होणार नाही.

कुबेर यंत्र

या यंत्रातून येणारी ऊर्जा सदैव आपल्याभोवती कवच म्हणून काम करते. या यंत्रांचे मंत्रोच्चारासह व्यवस्थित धारण केल्यास त्याचा लाभ तर होतोच, शिवाय त्याची शक्तीही अबाधित राहते. हे यंत्र धनाचे अधिपती कुबेर यांचे आहे. ह्या यंत्राच्या प्रभावाने यक्षराज कुबेर प्रसन्न होऊन अतुल संपत्तीचे रक्षण करतात. हे यंत्र सोने, चांदी किवा ताम्र धातू चे असते. हे यंत्र घरात किवा धंद्याचा ठिकाणी असणे जरुरी आहे. या यंत्राच्या स्थापनेने दारिद्रतेचा नाश होतो व धन -यश यांची प्राप्ती होते.

या यंत्राची स्थापना कोणत्याही बुधवारी किवा शुक्रवारी करावी. तसेच धनत्रयोदशी, पौर्णिमा,एकादशी या शुभमुहूर्तावर देखील कुबेर यंत्राची स्थापना हा शुभ योग आहे. प्रथम उत्तराभिमुख (उत्तर दिशेस तोंड करून) बसावे नंतर स्वतःच्या कुलदेवतेचे व श्री गणेशांचे स्मरण करावे व भगवान कुबेर यांना नमस्कार करून आपली मनोकामना सांगावी व खालील कुबेर मंत्राची माळ १०८ वेळा करावी
ll ॐ हिम् श्रिम् क्लिम् वित्तेश्र्वराय नम :
मंत्र पूर्ण झाल्यावर भगवान कुबेरांची आरती व मंत्रापुष्पाजली म्हणावी.

दसरा

विजयादशमीच्या,दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून परस्परांना देण्याची जी प्रथा आहे,त्यामागे भगवान कुबेरांच्या औदार्याचीच कथा आहे. महर्षी कौत्स यांच्या शिष्याला,गुरुदक्षिणा देता यावी,म्हणून भगवान कुबेरांनी अमाप धनवर्षा केली. पण गुरूंनी १८ कोटी सुवर्ण मुद्रा स्वीकारून,उरलेल्या लोकांना वाटून टाकल्या म्हणून तेव्हापासून,सोने देण्याची प्रथा दसऱ्याला सुरु केली .

जसे भगवान कुबेर यांच्यावर प्रसन्न झाले तसे आपणा सर्वांवर होवोत हीच सदिच्छा …!

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी हा धन संचय करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा एक अदभूत योग असतो. या दिवशी विशेष करुन घरी/व्यवसायाच्या ठिकाणी धनाचे दैवत कुबेर यांचे पुजन केले जाते. भगवान कुबेरांच्या कृपेमुळे मानसिक शांती, निकटवार्तियांचा स्नेह, प्रियजनांचे प्रेम, संपत्ती, प्रसिद्धी, ज्ञान, धैर्य, व्यवहार, चातुर्य, क्षमता, शक्ती, विजय, चांगली अपत्ये, सौंदर्य बुद्धिमता, हिरे, रत्ने, चांदी, धन, धान्य, अशी सुखे प्रात्प होतात. ह्या दिवसाला सोने, चांदी आदी मोल्यवान धातूंनी बनलेली नाणी, दागिने, भांडी खरेदी केली जातात. या दिवशी जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्यांची पूजा करतात. तसचं धनाचीही पूजा केली जाते.

पूजाविधी

धनत्रयोदशी दिवशी धनदेवता कुबेरंची पुजा हा अमृत योग आहे. या दिवशी सायंकाळी घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करून कुलदेवतेचे पुजन करावे. नंतर धनदेवता कुबेरांचे पुजन पुष्प, धुप, दिप दाखवुन करावे. कडुलिंबाच्या पानाला पंचामृत लावून ते पान नऊ वेळा धनदेवता कुबेरांच्या पोटास लावावे व प्रत्येक वेळी खालील मंत्र म्हणावा.

आपली मनोकामना धनदेवता कुबेर यांना सांगावी. त्या नंतर त्यांना कोणत्याही लाडूचा नैवेद्य दाखवावा. तसेच कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असा प्रसाद करून घरातील सर्वांना द्यावा यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

अशा प्रकारे मनपुर्वक पुजन केल्याने धनदेवता कुबेरांची आपल्यावर कृपा राहतो.

आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दीक शुभेच्छा…

कडुलिंब

भगवान कुबेरांच्या प्रिय वनस्पती कडूलिंब ही आहे. आपल्या घरात / व्यवसायाच्या ठिकाणी कडूलिंबच्या पानांचा टाळ असावा. त्याने वाईट शक्तीचा नाश होतो. व त्या जागेत पावित्र्य कायम राहते. दररोज धनदेवता कुबेरांच्या पोटाला कडूलिंबाची पाने लावून प्रार्थना करावी, असे केल्यास धनदेवता कुबेर प्रसन्न होतात.

कडुलिंबाचे फायदे

कडूलिंब अथवा कडूनिंब वा बाळंतलिंब (शास्त्रीय नाव :- Azadirachta indica ; कुळ : Meliacae) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा वृक्ष आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

संस्कृत - निम्ब/तिक्तक/अरिष्ट/पारिभद्र/पारिभद्रक/ पिचुमंद/ पिचुमर्द

हिंदी-नीम/ नीमला

बंगाली- निमगाछ

कानडी-बेवु

गुजराती-लींबडो

मलयालम-वेप्पु/ अतितिक्त

तमिळ-कड्डपगै/अरुलुंदी

तेलगु-निम्बमु

इंग्रजी – Indian lilak, Neam, Margosa Tree

लटीन – Azadirachta indica

आपल्या देशात सगळीकडे एक वाक्य ऐकू येत. ते म्हणजे ज्या देशात कडूलिंबाचे वृक्ष असतात, तेथे मृत्यू आणि आजार फिरकत नाहीत. कडूलिंबाचे झाड संपूर्ण दक्षिण आशियामध्ये पसरली असून आपल्या जीवनाशी त्यांचे एक वेगळे नाते जोडले गेले आहे. कडूलिंब फार गुणकारी असल्याने इतर देशांमध्येही त्याविषयी जागरुकता वाढली असून त्यांनाही कडूनिंबाचा लळा लागला आहे. कडूलिबाचे आयुर्वेदात मोठे महत्व सांगण्यात आले आहे. कडूलिंबाच्या औषधी गुणांना प्राचीन इतिहास आहे. चरक व सुश्रुत संहिता या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात त्याचा उल्लेख आला आहे. त्याला ग्रामीण औषधालय या नावानेही ओळखले जाते. कडूलिंबाला कुठल्याच प्रकारची कीड लागत नाही. भारतात कडूलिंबाच्या झाडाकडे ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून पहिले जाते. ग्रामीण भागात कडूलिंबाचा वापर साबण म्हणूनही करतात. त्याच्या कडूलिंबापासून मिळणारी पाने, निंबोळ्या,फांद्या व सालीचा उपयोग विविध आजारांवर करतात. कडूलिंबाचा 'एंटीसेप्टिक' म्हणूनही वापरले जाते.

कडूलिंबातल्या "मारगोसिन' या कडू रासायनिक द्रव्यामुळे त्याची चव कडू असते. याशिवाय त्यात ऐझारिडीन, रेझीन, टेनिन, बेन्झोईक एसिड, मेलिओटनिक एसिड, फिकस्ड ऑईल अशी अनेक रासायनिक द्रव्ये आहेत. "कडूपणा' हा कडुलिंबाचा विशेष गुणधर्म असला तरी या झाडाचे सर्व अवयव औषधी आहेत. पानांची पावडर उटण्यात वापरतात. त्यामुळे त्वचारोग बरे होतात. कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहीसे होतात. कडूलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तमपैकी अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम , इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे. कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडु, विपाकी, शीतवीर्य, लघु, मंदाग्नीकर- खोकला, ज्वर, अरुची, कृमी, कफ, कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते.

पुरळ, त्वचेला लालसरपणा कमी होतो. पानांचा काढा करून जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते. कारण पानं "जंतुनाशक' आहेत. शरीरावर गळवं झाल्यास पानाचं पोटीस बांधतात. पानापासून जे तेल काढतात ते कातडीच्या रोगावर उपयोगी पडतं. उष्णतेन डोकं दुखत असल्यास हे तेल डोक्यावर चोळल्यास डोखेदुखी कमी होते. कडुलिंबाच्या रसान गर्भाशयाचे रोग बरे होतात, रक्त शुध्द होते, कडुलिंबाच्या डहाळ्या दात घासण्यासाठी वापरतात. त्यामुळे तोंडाची दुर्गधी जाते. कडुलिंबाच्या सालीचा काढा वारंवार येणाऱ्या तापावर देतात. कडुलिंबाच्या पानांना पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते कडूलिंबाची पाने मधाबरोबर चावून खाल्यास अपचनाची तक्रार दूर होते. घरात डास झाल्यास कडूलिंबाची वाळलेली पाने लाकडाबरोबर जाळून धूर करावा. रोज ८ ते १० कडूलिंबाची पाने चावून खाल्यास रक्त शुध्द होते. पानांचा रस घेतल्यासही रक्तशुध्दी होते. कडूलिंबाची पाने धान्यांच्या साठयात टाकली असता कीड लागत नाही. कडूलिंबापासून तयार केलेल्या तेलाने मालिश केल्यास गंभीर असे चर्मरोग नाहीसे होतात. लिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास आरोग्यास लाभदायी ठरते. जुन्या कडूलिंबाच्या खोडातून जे पाणी निघतं ते त्वचारोगांवर उपयोगी आहे. जुनं खोड कापलं तर त्याला चंदनाच्या वासासारखा मंद सुवास येतो. फुलं विषारी असली तरी ती जंतुघ्न असल्यामुळे जखमांवर त्याचा लेप लावल्यास त्या लवकर बऱ्या होतात. विदेशात कडूलिंबावर संशोधन करण्यात येत असून डायबेटीजपासून तर एड्स, कन्सर यासारख्या गंभीर आजारावर जालीम औषधाचा शोध घेतला जात आहे याच्या अनेक उपयोगामुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे.

कडुलिंब खाणे रूढी गुढी पाडव्याची !
आधी कडु, प्राप्ती मग अमृताची !!

भगवान कुबेर सुवर्ण मंदीर 'स्वर्गभुमी' महाराष्ट्र